15-08-2019 - 15-08-2019

बांधला धागा राखीचा, परंतु हे बंधन नव्हे हाती ! जन्मो जन्मीच्या जुळलेल्या, या असतात रेशीमगाठी !!. श्रावण आला की वेध लागतात ते माहेरच्या माणसांना आणी सख्यांना भेटवणा-या सणांचे आणि विशेषतः राखी पौर्णिमेचे. राखी हा केवळ धागा नसून भावा-बहिणीच्या नात्याच्या आशा आणि विश्वासाचे ते प्रतिक असते. पण ज्यांना कोणी सख्खे व जवळचे नसते त्यांना आधार व विश्वास देण्यासाठी आपण दर वर्षी रो. क्लब कात्रज आणि टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यार्थी गृह येथिल विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतो. या वर्षी १५ ऑगस्टला हा कार्यक्रम पार पडला. जवळ जवळ १०० ते १२० विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. पुणे विद्यार्थी गृहाच्या सरांनी या वेळेस सूत्र संचालन केले. माई, चित्राताई, नमिता, गौरी, मुग्धा, कुहू, चिन्मयी यांनी विद्यार्थ्यांना ओवाळून राखी बांधली. चित्रा ताई आणि अतुल दुर्वे यांनी अनुक्रमे समोसा आणि पॅटीस याचा अल्पोपहार मुलांना दिला. टिळक रोड क्लब तर्फे खोबऱ्याची बर्फी दिली. आपल्या क्लब मधील महिलांनी गोळा केलेल्या निधी मधून पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. श्री. व सौ. राऊत, श्री व सौ. विवेक कुलकर्णी, श्री. व सौ. नाईक, श्री. हिरवे, श्री.भिसे, सौ. चित्रा ताई, सौ.मुग्धा, कुहू, चिन्मयी, यांची उपस्थिती होती. पुणे विद्यार्थी गृहाचे भोसले सर आणि रमेश कुलकर्णी सर यावेळी उपस्थित होते.

Project Details

Start Date 15-08-2019
End Date 15-08-2019
Project Cost 10000
Rotary Volunteer Hours 21
No of direct Beneficiaries 120
Partner Clubs RCP Tilak road
Non Rotary Partners
Project Category Others