Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

Lecture on Pranic healing

 1 February 2020
 Muktangan Eng. School (Wardekar Hall), 44 Vidyanagari Parvati
 Kishore Kulkarni
 
 
 रोटरी वर्षं २०१९-२० *साप्ताहिक सभा क्र ३०* शनिवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२० सायं ७.३० वाजता स्थळ: एम.बी.ए.हाॅल, मुक्तांगण, पुणे. मंडळी, *आपला क्लब सातत्याने आरोग्य विषयक कार्यक्रम समाजासाठी करतोय. पण आपल्या सभासदांच्या आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. मागील सभेत आपण आरोग्यासाठी आयुर्वेदातील बाह्यांगाची माहिती घेतली. आता अंतरंगाकडे वळू. प्राणीक हिलींग - ही एक शक्तीवर आधारीत शरीर व मन तंदरुस्त ठेवण्याची कला आहे. त्यातील तज्ञ श्री. किशोर कुलकर्णी हे या विषयाची माहिती देण्यासाठी येणार आहेत.* *आपल्या आरोग्या विषयी सतर्क राहण्या साठी आपण सर्व येताय ना?* मग, लवकरात लवकर आपल्या उपस्थिती बाबत कळवा.... कार्यक्रमानंतर *रो धनंजय व रो वर्षा हिरवे* यांच्या कडील रुची भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. *रो नमिता नाईक ( संचालक, क्लब व्यवस्थापन)* *रो विद्या पाटील ( अध्यक्ष)* *रो समीर प्रभुणे (सचिव)*
 22
 आपण स्वतः स्वतःला बर करू शकू अशी शक्ती खर तर परमेश्वराने प्रत्येकालाच दिलेली असते. परंतु त्याची जाणीव प्रत्येकाला होतेच असे नाही. आपण किरकोळ कारणासाठी सुद्धा आयुर्वेद, होमिओपॅथी, अल्लोपथ्यी यांचा वापर करीत असतो. परंतु अशी शक्ती आपल्याला जागृत करता आली आणि त्याच्या वापराने आपण स्वतःच स्वस्थ झालो तर? होय, योग प्राण शक्ती च्या माध्यमातून हे करणं शक्य आहे. याला प्राणिक हिलिंग पध्दती असेही म्हणतात. म्हणून या विषयाची ओळख करून देण्यासाठी त्यातील तज्ञ श्री. किशोर कुलकर्णी आपल्याकडे आले होते. शरीराबरोबरच मनाचेही स्वास्थ्य कसे उत्तम राखता येईल या बाबत त्यांनी विवेचन व मार्गदर्शन केले. ही पद्धत रेकी, महिकारी, पेक्षा कशी वेगळी आणि विना स्पर्श / विना औषध असल्याचे सांगितले. तसेच या मध्ये कोणतेही नकारत्मक परिणाम होत नसल्याचे ही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की तणावामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो आणि आपण बर्याच वेळा दुसऱ्यावरचा राग मनात धरून बसतो. त्याने प्राण शक्ती जागृत करताना शरीरा मध्ये अडथळे निर्माण होतात. ते नाहीसे करण्यासाठी त्यांनी ५ मिनिटांचा एक क्षमा साधनेचा प्रयोग सर्वांकडून करून घेतला. त्याने खूप शांत वाटत असल्याचे आणि एका वेगळ्याच विषयावर माहिती मिळाल्याने समाधान वाटल्याचे काही उपस्थित सभासदांनी सांगितले. पाहुण्यांची ओळख रो. मिलिंद पाटील यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन रो. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमानंतर फेलोशिप रो. धनंजय व रो. वर्षा हिरवे यांनी निर्मल बाग सभागृहात दिली. गरम गरम पुरी, मिक्स भाजी, चटणी, बटाटा वडा, शिरा या चविष्ट जेवणाने सांगता झाली.
 
 
 Regular
Images  
Lecture on Pranic healing Lecture on Pranic healing
Lecture on Pranic healing Lecture on Pranic healing